S M L

चंद्रपूर, बल्लारपूर देशातली सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनं !

बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर साक्षात ताडोबा मधील पराक्रमी वाघ पायऱ्यांवर साकारला असून हा एक सेल्फी पॉईट झाला आहे.

Sachin Salve | Updated On: May 2, 2018 11:26 PM IST

चंद्रपूर, बल्लारपूर देशातली सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनं !

चंद्रपूर, 02 मे : भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाची जोडी म्हणून चंद्रपूर-बल्लारपूरची निवड झाली आहे. आज नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाने घोषित केलेल्या भारतातल्या सर्वोत्तम रेल्वे स्टेशनमध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूरच्या प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. चंद्रपूरसाठी ही बातमी आनंदाची असून प्रयत्नपूर्वक केलेल्या प्रयत्नांना आलेले यशाची कहाणी सुद्धा आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातीता या स्थानकाच्या सौदर्य करणाचा निर्णय झाला. वर्षभरापूर्वी याठिकाणी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयामार्फत आदिवासींमध्ये असणाऱ्या लोककला आणि राष्ट्रीय उद्यान ताडोबातील वन्यजीवाच्या वैभवाला साकारण्यासाठी चित्रकारांच्या चमू कार्यरत झाल्या. आणि बघताबघता चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला. चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर आलेल्या प्रत्येक प्रवाशाला या ठिकाणी काढण्यात आलेल्या विविध वन्यजीवांचे चित्र आकर्षूण घेते. बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर साक्षात ताडोबा मधील पराक्रमी वाघ पायऱ्यांवर साकारला असून हा एक सेल्फी पॉईट झाला आहे.

त्यामुळे बल्लारपूर स्टेशनवर केलेला कुठलाही प्रवासी या ठिकाणी वाघाच्या समोर उभा राहिलेला सेल्फी काढल्याशिवाय बाहेर पडत नाही. गेल्या वर्षभरात यासाठी प्रयत्न करणारे  सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या या घोषणेचे स्वागत केलेले आहे. त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे ही यासाठी आभार मानले. नॅशनल ट्रान्सपोर्ट इनहाऊस स्टेशन ब्युटीफिकेशन स्पर्धेमध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूर प्रथम आले आहे. आज रेल्वे मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या एका पत्रकामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2018 11:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close