04 सप्टेबर : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख धरणापैकी एक कोरपना तालुक्यातील अमलनाला धरणातले पाणी मोठ्या प्रमाणात एकाएकी हिरवं झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान चंद्रपुरचे पालकमंञी सुधीर मुनगंटीवारांच्या आदेशावरुन प्रदुषण नियंञण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केलीय. अमलनाला धरण जिल्हयातले मोठे धरण असून या धरणातूनच अंबुजा सिमेंट कारखान्यासह शेतीसाठी पाणी सोडल जात. कालपासुन हे धरणातले पाणी अचानक हिरवेगार झाल्याने शेतक-यांनी याची माहीती तालुका प्रशासनाला दिली. हे पाणी नेमकं कशामुळे हिरवं झालं याबाबत विविध चर्चा सुरु झाली आहे