चंद्रकांत पाटील हेच दुसऱ्या क्रमांकाचे नेते, भाजपनं काढलं परिपत्रक

चंद्रकांत पाटील हेच दुसऱ्या क्रमांकाचे नेते, भाजपनं काढलं परिपत्रक

नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर दुसऱ्या क्रमांकाचं पद जाऊ शकतं. कारण नियमाप्रमाणे माजी मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद दिलं जातं.

  • Share this:

24 आॅक्टोबर : चंद्रकांत पाटील हेच दुसऱ्या क्रमांकाचे नेते असल्याचं परिपत्रक भाजपनं काढलंय.विधान परिषद सभागृह नेता म्हणून मुख्यमंत्र्यांनंतर दुसरा क्रमांक चंद्रकांत पाटलांचाच राहणार, असं या पत्रकात म्हटलं आहे.

नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर दुसऱ्या क्रमांकाचं पद जाऊ शकतं. कारण नियमाप्रमाणे माजी मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद दिलं जातं. तसं झालं तर ते पद नारायण राणेंकडे जाऊ शकतं. चंद्रकांत पाटील हे महसूल मंत्री आहेत. तरीही हे पद त्यांच्याकडेच राहणार. म्हणून अध्यादेश काढून दुसऱ्या क्रमांकाचा पद भाजपनं  स्वतःकडे  ठेवलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2017 10:06 AM IST

ताज्या बातम्या