10 लाख बोगस शेतकऱ्यांच्या विधानावरून चंद्रकांत पाटलांचं घूमजाव

'10 लाख शेतकरी बोगस आहेत' या वादग्रस्त विधानावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी आता घूमजाव केलंय. कर्जमाफीबाबत बोलताना चंद्रकात पाटलांनी हे धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आयबीएन लोकमत बेधडक या कार्यक्रमातून चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा फोलपणा उघडकीस आणला होता.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2017 06:26 PM IST

10 लाख बोगस शेतकऱ्यांच्या विधानावरून चंद्रकांत पाटलांचं घूमजाव

मुंबई, 13 सप्टेंबर : '10 लाख शेतकरी बोगस आहेत' या वादग्रस्त विधानावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी आता घूमजाव केलंय. कर्जमाफीबाबत बोलताना चंद्रकात पाटलांनी हे धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर आयबीएन लोकमत बेधडक या कार्यक्रमातून चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा फोलपणा उघडकीस आणला होता. कारण असं विधान करताना चंद्रकांत पाटलांनी कोणतेही पुरावे अथवा आकडेवारी दिली नव्हती. कर्जमाफीसंदर्भातल्या विधानावरून आपण अडचणीत सापडल्याचं लक्षात येताच चंद्रकांत पाटलांनी सारवासारव केलीय.

माझ्या '10 लाख शेतकरी बनावट आहेत' या शब्दाचा विपर्यास करण्यात आल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात 158 कोटी रुपयांची बनावट कर्जमाफी झाल्याचं उघडकीस आलंय. यावेळीही अशाच प्रकार घडू शकतो. म्हणूनच आमचं सरकार यावेळी अतिशय काटेकोर पद्धतीनं फॉर्म भरून घेत आहे. त्यामुळे बनावट अर्ज आपोआप बाद होताहेत त्याच अर्जाची संख्या दहा लाख होईल, अशी शक्यता समोर येतेय, असं मी म्हणालो होतो. अशी सारवासारव चंद्रकांत पाटील करताना दिसताहेत.

दरम्यान, भाजपचेच खासदार नाना पटोले यांनीही बोगस शेतकऱ्यांच्या विधानावरून चंद्रकांत पाटलांवर टीका केलीय. कोणतेही पुरावे हाती नसताना चंद्रकांत पाटील असं बेजाबदार विधान करूच कसं शकतात. या विधानाची आपल्याला चिड येतेय असंही नाना पटोलेंनी म्हटलंय. तसंच सरकारकडे अशी कोणतीही आकडेवारी नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितल्याचं नाना पटोले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 06:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...