S M L

चंद्रकांत पाटलांच्या कन्नड गाण्यामुळे वाद; सीमाभागातून संतापाची लाट

चंद्रकांत पाटील यांनीच कन्नड भाषेचं कौतुक केलं आहे. गाण्याची ओळ म्हणत जन्मावे तर कर्नाटकातचं असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांच्या या वाक्यामुळे सीमाभागात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2018 09:49 PM IST

चंद्रकांत पाटलांच्या कन्नड गाण्यामुळे वाद; सीमाभागातून संतापाची लाट

21 जानेवारी : गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव सीमाप्रश्न हा प्रलंबित आहे. आणि हाच प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पण चंद्रकांत पाटील यांनीच कन्नड भाषेचं कौतुक केलं आहे. गाण्याची ओळ म्हणत जन्मावे तर कर्नाटकातचं असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांच्या या वाक्यामुळे सीमाभागात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाकमध्ये एका कार्यक्रमात आपल्या भाषणात कन्नड गाण्याची ओळ म्हटली आहे. व्यासपीठावरून मंत्री पाटील यांनी 'हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकू' या गाण्याचे बोल म्हटले. त्यांनी गायलेल्या या गाण्याचा अर्थ 'जन्मले तर कर्नाटकमध्येच जन्मावे,' असा आहे. त्यामुळे सीभागात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात.

पाटील यांच्या या कवितेमुळे सीमाभागातील मराठी बांधवांचा अपमान केल्याची भावना विविध संघटनांमधून व्यक्त होत आहे. बेळगावतली मराठी युवा संघटना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं पाटील यांना समन्वयक मंत्री पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीनं चंद्रकांत पाटलांती नेमणूक रद्द करून सीमाप्रश्नांची जाण असलेला मंत्री नेमावा अशी मागणी केली आहे. चंद्रकांत पाटलांनी गायलेल्या या गाण्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे हे नक्की. यावर आता काय हालचाली होतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2018 09:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close