विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला ठरला, चंद्रकांत पाटलांची घोषणा

विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला ठरला, चंद्रकांत पाटलांची घोषणा

भाजप नेते आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच युतीच्या फॉर्म्युल्यावर भाष्य केलं आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 2 जून : लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालं. त्यानंतर आता दोन्ही पक्ष विधानसभेतही एकत्रच लढतील, हे जवळपास निश्चित आहे. पण कोण किती जागा लढवणार याबाबत आतापर्यंत दोन्ही पक्षांतील कुठल्याही नेत्याने भाष्य केलं नव्हतं. भाजप नेते आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच युतीच्या फॉर्म्युल्यावर भाष्य केलं आहे.

भाजप-शिवसेना युतीमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना जास्त जागा लढवणार, हे सुरुवातीपासूनचं समीकरण होतं. पण आता राजकीय परिस्थिती पालटली आहे. भाजपचं महाराष्ट्रासह देशभरात वर्चस्व निर्माण झालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील युतीतही आता समसमान जागा लढवण्यात येतील, अशी चिन्ह आहेत. चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

'महाराष्ट्र विधानसभेतील 288 जागांपैकी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागा लढवणार आहे, तर 18 जागा घटकपक्षांना दिल्या जातील,' अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मराठवाड्यातील दुष्काळी दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत युतीच्या फॉर्म्युल्यावर भाष्य केलं आहे.


VIDEO: घोटभर पाण्यासाठी संघर्ष; रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरमागे धावल्या महिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2019 02:22 PM IST

ताज्या बातम्या