रात्रभर प्रिंटिंग करून मराठा आरक्षणाचा कायदा केला : चंद्रकांत पाटील

रात्रभर प्रिंटिंग करून मराठा आरक्षणाचा कायदा केला : चंद्रकांत पाटील

हे मराठा आरक्षण न्यायालयात टिकणारं असून त्यासाठीसुद्धा खूप पूर्वतयारी केली आहे, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

  • Share this:

कोल्हापूर, 2 डिसेंबर : 'आश्वासन दिल्याप्रमाणे 1 डिसेंबरची पहाट उजाडण्याच्या आधी रात्रभर प्रिंटिंग करून मराठा आरक्षणाचा कायदा अंमलात आणला,' असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. हे मराठा आरक्षण न्यायालयात टिकणारं असून त्यासाठीसुद्धा खूप पूर्वतयारी केली आहे, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

मराठा आरक्षणाचे काम भाजपने राजकीय अजेंड्यापेक्षा निष्ठेनं केल्याचं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

'हे आरक्षण 100 टक्के टिकणार'

आम्ही दिलेलं मराठा आरक्षण न्यायालयातही 100 टक्के टिकणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

'वकिलांची फौज उभी करू'

राज्यात आरक्षणाची असाधारण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेले तरी ते कायदेशीर असल्याचे मांडण्यासाठी वकिलांची फौज उभी केली जाईल, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.

इतर समाजाच्या आरक्षणासाठीही सकारात्मक

इतर समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा आमचं सरकार सकारात्मक आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी धनगर समाजाला आरक्षणाबाबत आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापुरी फेटा बांधून वाजत गाजत स्वागत करण्यात आलं.


...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 08:35 AM IST

ताज्या बातम्या