राणे हुशार नेते, योग्य तो निर्णय घेतील-चंद्रकांत पाटील

राणे हुशार नेते, योग्य तो निर्णय घेतील-चंद्रकांत पाटील

नारायण राणे यांना कुणाची भेट घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. ते कुणाला भेटतात हे त्यांनी ठरवावं.

  • Share this:


संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

03 डिसेंबर : नारायण राणे हे हुशार नेते आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी त्या भेटीनंतरही ते योग्य निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केलं आहे.

आज कणकवलीमध्ये नारायण राणे आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीबाबत चंद्रकांत पाटील यांनी सुचक वक्तव्य केलं. नारायण राणे यांना कुणाची भेट घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. ते कुणाला भेटतात हे त्यांनी ठरवावं. राणे हे तसे हुशार नेते आहे. त्यांनी जरी भेट घेतली असली तरी योग्य निर्णय घेतील असं पाटील म्हणाले.

तर दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टात याचिका जरी दाखल झाली असली तरी सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्यासह तज्ञ वकील बाजू मांडणार असून मराठा आरक्षण विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली त्याचा कोणताही फरक पडणार नाही, वकिलांची मोठी ताकद सरकारच्या मागे आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर या आरक्षणाविरोधात याचिका होऊ शकते हीच शक्यता लक्षात घेऊन मराठा आरक्षण टिकावं, यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे.

मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर राज्य सरकारने दोन्ही सभागृहात विधेयक संमत करत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर याआधीच हायकोर्टात विनोद पाटील यांनी कॅव्हेट दाखल केलं आहे. त्यामुळे हायकोर्टात या प्रश्नावर कुठलीही याचिका दाखल झाल्यास विनोद पाटील यांचं म्हणणं कोर्टाला ऐकून घ्यावं लागणार आहे.

तर दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जाहीर करणं हे राज्यघटनेविरोधात आहे, अशी भूमिका घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं ही याचिका सादर करण्यात आली आहे.

==================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 04:06 PM IST

ताज्या बातम्या