मराठा समाजाला भडकावण्याचं काही नेत्यांकडून काम -चंद्रकांत पाटील

"मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करूनदेखील आरक्षण मिळालं नाही या मुद्द्यावरुन मराठा समाजाला भडकावण्याचं काम काही नेते करीत आहेत"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2017 11:20 PM IST

मराठा समाजाला भडकावण्याचं काही नेत्यांकडून काम -चंद्रकांत पाटील

08 नोव्हेंबर : मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करूनदेखील आरक्षण मिळालं नाही या मुद्द्यावरुन मराठा समाजाला भडकावण्याचं काम काही नेते करीत आहेत, असा गंभीर आरोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

मराठा प्रश्नासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील  जालना दौऱ्यावर आले असताना बोलत होते. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे मागास आयोगाची निर्मिती केली. मागास आयोगाने काम करण्यास सुरुवात केलीय आणि न्यायालयातील प्रकरण आपण अतिशय ताकदीने लढणार आहोत. त्याचवेळी ज्या गोष्टी सरकारनं मान्य केल्या त्या सर्वसामान्य विद्यार्थी- विद्यार्थिंनींपर्यन्त पोहोचण्यासठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु काहीजण राजकीय हेतुने एवढ्या सगळ्या मागण्या मान्य होवून आरक्षण मिळालं नाही या एकाच मुद्द्यावर मराठा समाजाला भडकावण्याचा प्रयत्न करताहेत असा आरोप पाटील यांनी केला.

तसंच त्या भडकावणाऱ्या नेत्यांना हे कळत नाहीये की सर्वसामान्य मराठा माणूस हुशार झालेला आहे.. सरकारला जे जे करता आलं ते ते सरकारने केलंय. आरक्षणाची लढाई सरकार सर्वांच्या बरोबरीनं.. सर्वांच्या पुढे राहून मोठमोठ्या वकिलांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये लढत आहे. न्यायालयातील लढाई आपण लवकरात लवकर जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 09:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...