मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या 'त्या' विद्यार्थ्यांना न्याय देणार-महसूलमंत्री

मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या वैद्यकीय पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना सरकार न्याय देणार,असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला पत्र देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 03:30 PM IST

मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या 'त्या' विद्यार्थ्यांना न्याय देणार-महसूलमंत्री

सागर सुरवसे (सोलापूर),

सोलापूर, 10 मे- मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या वैद्यकीय पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना सरकार न्याय देणार,असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला पत्र देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यशासनाकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना राज्य शासन न्याय देणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 200 पैकी 100 विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपनमधून प्रवेश मिळू शकतो तर उर्वरीत 100 पैकी किमान 40 विद्यार्थ्यांना प्रवेश न घेतल्याने शिल्लक राहिलेल्या जागातून प्रवेश मिळू शकतो. याशिवाय उर्वरीत 60 विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून कोटा वाढवून मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी केंद्र सरकारला पत्र देणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते आज सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत.


SPECIAL REPORT : नाशिकमध्ये 2 महिन्यात 40 मोरांचा मृत्यू, वन खातं काय करतंय?

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...