'शरद पवार...तुमच्या कुटुंबातील एकही व्यक्ती लोकसभेत जाणार नाही'

'शरद पवार यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती यावेळी निवडून येणार नाही. त्यामुळे पवारांनी त्यांच्या पराभवाची कारणं लिहायला सुरुवात केली आहेत.'

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 11:13 AM IST

'शरद पवार...तुमच्या कुटुंबातील एकही व्यक्ती लोकसभेत जाणार नाही'

जळगाव, 1 मे : 'बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना?' अशी शंका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

'शरद पवार यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती यावेळी निवडून येणार नाही. त्यामुळे पवारांनी त्यांच्या पराभवाची कारणं लिहायला सुरुवात केली आहेत. तीन राज्यात आमचा पराभव झाला, तो आम्ही मान्य केला. शरद पवारांनीही पराभव झाल्यास मान्य करावा,' असा हल्लोबल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपने जोरदार ताकद लावली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर बारामती शहरात अनेक दिवस तळ ठोकून होते. त्यामुळे ही जागा जिंकण्याचा दावा भाजपकडून वारंवार करण्यात येत आहे. तसंच माढ्यातून तुम्ही उभा राहू नका, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना दिला होता.

याबाबत पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'देशभरात ईव्हीएमबाबत अनेकदा शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. कधीही निवडणूक न लढवणारे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते इतक्या आत्मविश्वासाने बारामतीची जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. हा दावा ईव्हीएमच्या जोरावर तर केला जात नाही ना?'

Loading...

'...तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल'

'ईव्हीएम छेडछाड झाली तर एखादा माणूस संसदेत जाईल. पण त्यामुळे संसदीय लोकशाही प्रक्रियेवर मोठा आघात होईल. यातून लोकांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वासही उडू शकतो,' असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.


VIDEO: मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, भाजप नगरसेवकावर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 11:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...