आमच्या खिशात अजून खूप पत्ते शिल्लक - चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

'आमच्याकडे एक वर्ष शिल्लक आहे आणि खिशात खूप पत्ते शिल्लक आहेत त्यामुळं विरोधकांनी काळीजी करू नये'

News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2018 04:57 PM IST

आमच्या खिशात अजून खूप पत्ते शिल्लक - चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

सांगली, 02 डिसेंबर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केलाय. आम्ही चार वर्षे मेहनत घेऊन आरक्षण दिलंय, फक्त ऑफिसमध्ये बसून निर्णय घेतले नाही. पूर्ण विचारांती आणि दुरदृष्टीचा विचार करून निर्णय घेतले आहेत. अजून आमच्याकडे एक वर्ष शिल्लक आहे आणि खिशात खूप पत्ते शिल्लक आहेत त्यामुळं विरोधकांनी काळीजी करू नये असा सूचक इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.


चंद्रकांत पाटील म्हणाले, 2019 च्या निवडणुकीसाठी आम्हाला वेळ आहे. आम्ही असे पत्ते टाकू की पुढची निवडणूक लढऊच नयेत असं विरोधकांना वाटेल. मराठा आरक्षण टिकेल अशी सरकारला खात्री आहे. या आरक्षणाविरोधी कुणी कोर्टात जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं.


मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आरक्षणाची मागणी होत होती. त्यासाठी अनेक अडचणीही होत्या पण अडथळ्यांची सर्व शर्यत पार करत सरकारने हा प्रश्न मार्गी लावला. जनमताचा रेटा प्रचंड असल्याने सर्वच राजकीय पक्षांना त्याला पाठिंबा देण्याशीवाय पर्याय राहिला नाही.

Loading...


मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता धनगर आरक्षणाचा प्रश्न पुढं आलाय. धनगरांना आरक्षण देऊ असं आश्वासन भाजपने निवडणुकीत दिलं होतं. या आश्वासनावर भाजप कायम असून लवकरच तेही आश्वासन सरकार पूर्ण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे. त्यामुळं निवडणुकीच्या आधी महत्वाचे प्रश्न मार्गी लागेल याची मुख्यमंत्री खबरदारी घेत आहेत.


 


 

VIDEO : शाहरूखच्या बिनधास्त प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची बेधडक उत्तरं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...