धक्काबुक्कीनंतर चंद्रकांत खैरे भेटले काकासाहेबाच्या कुटुंबियांना!

धक्काबुक्कीनंतर चंद्रकांत खैरे भेटले काकासाहेबाच्या कुटुंबियांना!

सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज मराठा आंदोलनादरम्यान मयत झालेले काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

  • Share this:

औरंगाबाद, ता. 26 जुलै : सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज (गुरुवार 26 जुलै रोजी) मराठा आंदोलनादरम्यान मयत झालेले काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्यांनी काका शिंदेच्या कुटुंबियांना 5 लाखाची आर्थिक मदत मदतही दिली. या वेळी त्यांच्यासोबत शिवसैनिक आणि पोलिसांचा मोठा ताफा होता.

औरंगाबाद-अहमदनगर रोडवरील कायगाव इथं गोदावरी पात्रावरील पुलावर २३ जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जलसमाधी आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाने नदीतच उडी घेतली. प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो त्यात वाहून गेला. काही मच्छीमारांनी त्याला पात्रातून बाहेर काढून गंगापूर येथील ग्रामीणरुग्णालयात दाखल केले, मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. २४ जुलै रोजी त्यांच्या पार्थिवावर कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माझ्या टेबलावर फाईल असती,तर मीच आरक्षण दिलं असतं -पंकजा मुंडे

काकासाहेब शिंदेच्या अंत्संस्काराप्रसंगी पोहोचलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली आणि अंत्यविधी स्थळावरून काढून लावले. पोलिसांच्या सुरक्षाकवचामुळे ते सुखरूप बाहेरही पडले. त्यानंतर आज खैरे यांनी मयत काका शिंदे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्यांनी आर्थिक मदत म्हणून काका शिंदेच्या कुटुंबियांकडे 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

यावेळेस काकासाहेबाच्या कुटुंबियांशी बोलतांना ते म्हणाले की, . मला धक्काबुकीं करणारे या गावातील नव्हते, ते ते बाहेरून आले होते. अंत्यविधी दरम्यान मला आल्या पावली परत जावे लागले याचे मला दुःख नाही. मात्र काकासाहेबाचे अंत्यदर्शन घेता आले नाही याचे मला दुःख आहे अशी प्रतिक्रिया खैरे यांनी काकासाहेबाच्या कुटुंबियांकडे व्यक्त केली.

हेही वाचा...

मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा

'पश्चिम बंगाल'चं नामकरण, आता फक्त 'बांग्ला' म्हणायचं!

वजन कमी करायचं... तर मेंदूच्या या भागावर ठेवा नियंत्रण

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 06:10 PM IST

ताज्या बातम्या