राज्यात 18 ते 21 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता

राज्यात 18 ते 21 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हवेच्या दिशा आणि दाब यामध्ये बदल होतोय.

  • Share this:

13 नोव्हेंबर : राज्यभरात थंडीची चाहुल लागल्यानंतर सर्वत्र हुडहुडी भरलीये. मात्र 18 आणि 21 नोव्हेंबरला पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज आहे.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हवेच्या दिशा आणि दाब यामध्ये बदल होतोय. परिणामी समुद्रात बाष्प निर्मिती सुरू झाल्यानं येत्या 18 नोव्हेंबरपासून राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. ज्येष्ठ कृषी-हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी तशी माहिती दिलीय.

पुणे, अहमदनगर जिल्ह्यासह मराठवाड्याचा पुर्वेकडील भाग तसंच विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

मध्य महाराष्ट्रात मात्र आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. हा पाऊस अल्पशा प्रमाणात होईल, त्याचा ज्वारी, तूर या पिकांच्या वाढीसाठी फायदा होईल. तर भाजीपाला, फळं आणि द्राक्ष, डाळिंबासाठी हा पाऊस थोडा त्रासदायक ठरेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 08:32 PM IST

ताज्या बातम्या