S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी हॉस्पिटलमध्येच खोदलं चेंबर
  • VIDEO : अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी हॉस्पिटलमध्येच खोदलं चेंबर

    News18 Lokmat | Published On: Feb 5, 2019 10:48 PM IST | Updated On: Feb 6, 2019 08:54 AM IST

    सिद्धार्थ गोदाम, 05 औरंगाबाद : गर्भलिंग निदान चाचणी आणि स्त्री भ्रूण हत्या होत असल्याच्या संशयातून औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागानं विमल मदर केअर हॉस्पिटलवरची छापा मारला होता. या कारवाईत धक्कादायक माहितीसमोर आली आहे. छापेमारीदरम्यान पालिकेच्या पथकाला विमल मदर केअर हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या बांधण्यात आलेले चेंबर्स आढळून आले आहेत. गर्भपातानंतर अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी चेंबर्सचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. म्हणूनच छापेमारी करणाऱ्या पथकानं खोदकाम करून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विमल मदर केअर हॉस्पिटलच्या संचालिका वर्षा राजपूत यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी गर्भलिंग निदान करणाऱ्या सूरज राणाला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानं पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close