'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या घोषात जेजुरीत चंपाषष्ठी महोत्सवाला सुरूवात

यळकोट यळकोट जय मल्हारचा असा जयघोष आणि प्रत्येकांकडून उधळला जाणाऱ्या या भंडाऱ्यामुळे जेजुरीचा हा गड सोन्याचा होऊन जातो. परंपरेनुसार चंपाषष्ठीचा हा उत्सव अशाच पद्धतीने साजरा केला जातो.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 19, 2017 07:17 PM IST

'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या घोषात जेजुरीत चंपाषष्ठी महोत्सवाला सुरूवात

जेजुरी,19 नोव्हेंबर: महाराष्ट्रचं आद्य कुलदैवत खंडेरायच्या चंपाषष्ठी महोत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे हाच उत्सव 'देव दिवाळी'ची सुरूवातही मानला जातो आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील धार्मिक उत्सवांमध्ये अत्यंत वैभवशाली मानला जातो. या उत्सवासाठी भाविकांनी जेजुरीत गर्दी केली आहे.

यळकोट यळकोट जय मल्हारचा असा जयघोष आणि प्रत्येकांकडून उधळला जाणाऱ्या या भंडाऱ्यामुळे जेजुरीचा हा गड सोन्याचा होऊन जातो. परंपरेनुसार चंपाषष्ठीचा हा उत्सव अशाच पद्धतीने साजरा केला जातो. अर्थात या उत्सवाची सुरवात होण्यामागचा इतिहासही तेवढाच रोमहर्षक आहे. पुराणात सांगितल्या गेलेल्या कथेनुसार आजही चंपाषष्ठीला देवांनी दानवांना परास्त केले. त्यानंतर हा उत्सव सुरू झाला.

अनादी काळापासून तो सुरू आहे. आज देव दानव ही संकल्पना जरी अस्तित्वात असल्याचं मानलं जातं नसलं तरीही वाईट प्रवृत्तीवर नेहमी चांगली प्रवृत्तीच विजय मिळवते हे वास्तव आहे आणि या उत्सवाच मर्मही हेच आहे. घट स्थापना ते अन्नदानापासून पालखी सोहळ्यापर्यंत चालणाऱ्या सहा दिवसातील प्रत्येक उत्सवाला भाविक अगदी श्रद्धेने आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

अशा या उत्सवांमधून विठोबाचं खंडोबांचं तर देवपण सिद्ध होतंच पण तसंच समतेचा एकतानतेचा संदेशही मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2017 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close