S M L

राज्यभर शेतकरी संघटनांचं चक्काजाम आंदोलन

शेतकरी संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागण्यांसाठी विविध संघटनांनी आज चक्काजाम आंदोलन सुरू केलंय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 14, 2017 11:20 AM IST

राज्यभर शेतकरी संघटनांचं चक्काजाम आंदोलन

14 आॅगस्ट : शेतकरी संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागण्यांसाठी विविध संघटनांनी आज चक्काजाम आंदोलन सुरू केलंय. प्रहार संघटनेने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी वर्धा हिंगणघाट मार्गावर चक्का जाम केला.  मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.  या पुतळ्याला दहातोंडी रावणाचे स्वरूप दिले होते. सावंगी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक  केली .

तर दुसरीकडे कोल्हार घोटी मार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू झालंय. अकोले येथे सुकाणू समितीचा रास्तारोको सुरू आहे. सुकाणू समितीचे डॉ. अजित नवले आंदोलनात सहभागी झालेत.  आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेत.

कुठे कुठे सुरू आहे चक्काजाम?


  • शिर्डी - राहुरीत नगर मनमाड रस्ता अडवलाय. शिर्डी शिंगणापूर रस्ता शेतकऱ्यांनी अडवला.
  • राहुरी येथे चक्काजाम
  • Loading...

  • शेतकरी संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागणीसाठी रास्ता रोको
  • परभणी- सुकाणू समितीच्या चक्का जाम आंदोलनाला सुरुवात
  • परभणी-गंगाखेड,परभणी-वसमत,परभणी-पाथरी,परभणी-जिंतूर या प्रमुख मार्गावर आंदोलन
  • 2 राज्य महामार्ग आणि 1 राष्ट्रीय महामार्ग ठप्प
  • परभणीत 6 ठिकाणी तर जिल्ह्यात तब्बल 34 ठिकाणी चक्का जामला सुरुवात
  • पुणतांबा येथे चक्काजाम
  • पुणतांबा येथील शिवाजी चौकात रास्ता रोको
  • डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2017 11:20 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close