छगन भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस निरीक्षक निलंबित

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत अर्वाच्य अपशब्द वापरणाऱ्या आणि शिवीगाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2018 02:30 PM IST

छगन भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस निरीक्षक निलंबित

18 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत अर्वाच्य अपशब्द वापरणाऱ्या आणि शिवीगाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. श्रीगोंद्यामधले पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांना तात्काळ निलंबित करा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंनी दिले. पण या आदेशाआधी विधिमंडळात गदारोळही झाला. जितेंद्र आव्हाडांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर विरोधर सरकारवर जोरदार बरसले.

मोदी सरकारची पहिल्यांदाच परिक्षा, अविश्वास ठराव लोकसभेत मंजूर

महावीर जाधव या नगर जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकाने एका सामान्य कटुबातील लोकांना धमकावून कुठलाही संबंध नसतांना छगन भुजबळ यांच्या नावाने अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आल्याचा मुद्दा जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. याला शिवसेनानं पाठिंबा दिला आहे. पण दरम्यान, विरोधकांनी या मुद्द्यावर विधिमंडळात गोंधळ घातला.

विरोधकांनी गोंधळ घालत वेलसमोर घोषणाबाजी केली. त्यानंतर महावीर जाधव पोलीस उपनिरिक्षक यांना तात्काळ निलंबित करण्याची अध्यक्षांची सुचना दिल्या आहेत.

हेही वाचा...

Loading...

तो सपासप वार करत होता, आणि लोक पाहत होते!, पोलिसाची हत्या सीसीटीव्हीत कैद

भाजपविरोधात आंदोलनामुळे मनसे कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

कांदिवलीत नग्न फोटो काढून 16 वर्षाच्या मुलाला केलं ब्लॅकमेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2018 02:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...