छगन भुजबळ जामिनासाठी पुन्हा एकदा हायकोर्टात!

पीएमएल कोर्टानं फेटाळलेल्या जामीनाला छगन भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात आव्हान दिलं आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 31, 2018 09:14 AM IST

छगन भुजबळ जामिनासाठी पुन्हा एकदा हायकोर्टात!

31 जानेवारी : पीएमएल कोर्टानं फेटाळलेल्या जामीनाला छगन भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात आव्हान दिलं आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या वतीनं ते निर्दोष असल्याचा पुनरूच्चार करत सुप्रीम मनी लाँड्रिंग कायद्यातील कलम ४५ (१) मध्ये केलेल्या बदलानंतर ईडीला आपली कस्टडी मागण्याचा काहीच अधिकार नाही, असा दावा भुजबळांकडून करण्यात आला होता.

महाराष्ट्र सदन घोटाळा हा निव्वळ राजकीय षडयंत्राचा भाग असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गेले २१ महिने आपण जेलमध्ये आहोत, पासपोर्ट ईडीकडे जमा आहे, त्यामुळे आता बाहेर येऊन स्वत:चं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे आपला जामीन अर्ज मंजूर करावा अशी विनंती भुजबळांच्यावतीनं कोर्टाला करण्यात आली होती. मात्र पीएमएलए कोर्टानं भुजबळांचा जामीन अर्ज फोटाळून लावताना त्यांच्या बाहेर येण्यानं अन्य साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टानं तसेच मुंबई हायकोर्टानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यावर भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर हायकोर्ट काय प्रतिक्रिया देत हे बघणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2018 09:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...