सुप्रीम कोर्टातही भुजबळांच्या पदरी निराशाच!

आता छगन भुजबळांच्या खटल्यावर जुलै महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे छगन भुजबळांना जुलैपर्यंत जेलचा समाचार घ्यावा लागणार आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2018 05:29 PM IST

सुप्रीम कोर्टातही  भुजबळांच्या पदरी निराशाच!

13 एप्रिल:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर  सुप्रीम कोर्टाकडूनही  दिलासा  मिळालेला  नाहीच.  भुजबळांची अटर रद्द करण्यासंदर्भातली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे

आता छगन भुजबळांच्या खटल्यावर जुलै महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे   छगन भुजबळांना जुलैपर्यंत जेलचा समाचार घ्यावा लागणार आहे.  अवैध मालमत्ता प्रकरणी भुजबळ तुरूंगात आहेत. दरम्यान उच्च न्यायालयातील    जामिनासाठी सुनावणी सुरु ठेवा असं भुजबळांच्या वकिलांकडून कोर्टात मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान  नाशिक मर्चंट बँकेनं आपल्या थकीत कर्ज वसुलीसाठी, आर्मस्ट्राँग कंपनीला पुन्हा नोटीस बजावली आहे. आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर ही भुजबळांच्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. पंकज भुजबळ, समीर भुजबळ हे या कंपनीचे संचालक असून त्यांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं लिलाव पद्धतीने 2009 मध्ये साखर कारखाना विकत घेतला होता. त्यांनतर तीन ते चार वर्षांनी करखान्याच्या कामाला सुरुवात झाली. साधारण चार वर्षे गाळप हंगामही या कारखान्यात चालू होता. 16/ 17 ला शेवटचा हंगाम निघाला, त्यावेळी शेकडो कर्मचारी या कारखान्यात कामाला होते.

मात्र, त्यांनतर कारखाना अडचणीत सापडला तो आजतागायत बंद आहे. या कारखान्याच्या  4 कोटी 34 लाखाच्या कर्जासाठी ज्या मालमत्ता तारण ठेवल्या होत्या त्यावर आता वसुली कारवाईला नामको बँकेनं सुरुवात केल्यानं जामीन म्हणून तारण ठेवलेल्या मालमत्ता बँकेनं ताब्यात घेतल्या. याकरिता वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रकाशित करून कारवाई सुरू केल्याचं बँक सूत्रांनी सांगितलं. एकंदरीत भुजबळ कुटुंबियांच्या अडचणीत या साऱ्यात  वाढ झाल्याचं मानलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...