News18 Lokmat

'फुकट्या' प्रवाशांकडून एकाच दिवसात चाडेचार लाखांचा दंड वसूल

फुकट्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी विभागाने खासं पथकं स्थापन केली होती.

News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2018 09:40 PM IST

'फुकट्या' प्रवाशांकडून एकाच दिवसात चाडेचार लाखांचा दंड वसूल

नागपूर 28 डिसेंबर : मध्य रेल्वेच्या नागपुर विभागाने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चांगला दंड वसूल केलाय. फुकट्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी विभागाने खासं पथकं स्थापन केली होती. त्यांनी धडक कारवाई करत शुक्रवारी तब्बल साडेचार लाखांचा दंड वसूल केला.


मध्य रेल्वेच्या या कारवाईत  25 रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि 84 टीसींचा समावेश होता. त्यांची विविध पथकं तयार करण्यात आली होती. गर्दीची आणि मोक्याची ठिकाणं निवडून त्या ठिकाणी ही पथकं नेमण्यात आली. आणि कारवाई करण्यात आली. या अचानक करण्यात आलेल्या कारवाईत जवळपास 1181 प्रवाशांकडे तिकीट सापडलं नाही. या सर्व प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून चार लाख अठ्ठावन हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


यातील काही प्रवाशांकडे तिकीटावर परवानगी असलेल्या क्षमतेपेक्षा जास्त सामान होते. अशा प्रवाशांकडून 1 लाख रुपये एकाच दिवशी वसूल करण्यात आले. प्रवाशांची संख्या प्रचंड  वाढली आणि स्टेशनचाही विस्तार झाला त्यामुळे टीसी आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते त्यामुळं फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखणं शक्य नसतं.

Loading...


त्यावर उपाय म्हणून अशी धडक करावाई करण्यात येते. त्यामुळं फुटक प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये धाक निर्माण होतो. प्रवाशांनी फुटक प्रवास करणं म्हणजे रेल्वेचच नुकसान होतं. परिणामी देशाचं नुकसान होतं. त्यामुळे नागरिकांनी फुटक प्रवास न करता रेल्वेच्या विकासात सहभागी व्हावं असं आवाहन रेल्वे विभागाने केल आहे.

SPECIAL REPORT : 'सिंघम' अधिकाऱ्याने मोडलं ड्रग्स माफियांचं कंबरडं, 1 हजार कोटींचं 'फेंटानिल' जप्त


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2018 09:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...