दुष्काळ दौऱ्याला दांडी मारून खासदार पोहचले साईंच्या दर्शनाला

13 खासदारांची ही विशेष समिती राज्यातल्या दुष्काळाची पाहणी करायला आली होती

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2017 05:59 PM IST

दुष्काळ दौऱ्याला दांडी मारून खासदार पोहचले साईंच्या दर्शनाला

21 एप्रिल : दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय संसदीय समितीने दुष्काळपाहणी ऐवजी देवदर्शन घेणं पसंत केलंय.

13 खासदारांची ही विशेष समिती राज्यातल्या दुष्काळाची पाहणी करायला आली होती. मात्र डाऊच बुद्रुक या गावाचा भेट द्यायचं टाळून त्यांनी सहकुटुंब शिर्डीला जाऊन साईदर्शन घेतलं.

सकाळी या समितीने संवत्सर या गावी जाऊन दुष्काळी स्थितीची पाहणी केली. आणि त्यानंतर त्यांनी थेट शिर्डी गाठली. या समितीत राज्यातील संजय धोत्रे आणि चिंतामण वनगा या दोन खासदारांचा समावेश आहे.

एकीकडे राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्राकडे डोळे लावून बसलेला असताना, राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेलं पथक साईदर्शनात रमल्याचं समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2017 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...