S M L

विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल!

या कॅमेऱ्याने दहावीच्या भूमिती आणि सायन्स विषयात विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचं संपूर्ण चित्रण कैद केलं आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 1, 2018 10:44 AM IST

विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल!

01 एप्रिल : दहावीच्या परीक्षेदरम्यान गोपनीयतेच्या नावाखाली वर्गातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर कापड टाकण्यात आलं होतं. पण त्यातील एका कॅमेऱ्यावरील कापड खाली पडल्यानं परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी शिक्षकांनी केलेला सगळा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या कॅमेऱ्याने दहावीच्या भूमिती आणि सायन्स विषयात विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचं संपूर्ण चित्रण कैद केलं आहे.

हा सगळा प्रकार संस्थाध्यक्षानीचं चव्हाटयावर आणलाय. विद्यार्थी हिताच्या लक्षात घेऊन आपण स्वतः हुन या प्रकाराबद्दल प्रेस घेऊन वाचा फोडावी लागत असल्याचा दावा ही संस्थाचालकांनी केला आहे .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ केंद्र संचालक यांच्याकडे उपलब्ध पुराव्यांसकट तक्रार अर्ज करून संस्था चालकांनी झाल्या प्रकाराबद्दल कारवाईची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे मात्र याबाबत अद्याप कुठलीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांवर कारवाई करण्याचा इशारा माध्यमिक शिक्षण विभागाने दिलाय.

दरम्यान, एवढे सगळे पुरावे देऊनही दोषींवर कारवाई झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा संस्थाचालकांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2018 10:42 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close