S M L

कोल्हापूर जिल्ह्यात 8 महिन्यांत लाच दिल्याचे 16 गुन्हे दाखल

विशेष म्हणजे या 16 मधील 7 गुन्हे हे चंद्रकांत पाटलांच्या महसूल विभागातील आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 19, 2017 09:57 AM IST

कोल्हापूर जिल्ह्यात 8 महिन्यांत लाच दिल्याचे 16 गुन्हे दाखल

कोल्हापूर, 19 ऑगस्ट: एकीकडे राज्य सरकारकडून भ्रष्टाचारमुक्त कारभारचा नारा दिला जात असतानाच राज्याचे महसूलमंत्री आणि क्रमांक 2चे मंत्री अशी ओळख असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याच कोल्हापूर जिल्ह्यात लाचखोरी वाढत चालल्याचं चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1 जानेवारीपासून म्हणजेच गेल्या 8 महिन्यात लाच मागितल्याप्रकरणी तब्बल 16 गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या 16 मधील 7 गुन्हे हे महसूल विभागातील आहेत.

2 दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महसूल विभागाचे 2 जण लाच घेताना 'रंगे हाथ' पकडले गेले. पन्हाळा तालुक्यातील मंडल अधिकारी अशोक बसवणे आणि भुदरगड तालुक्यातल्या आरळगुंडी गावातील महिला तलाठी लाच घेताना पकडली गेली आहे. मंडल अधिकाऱ्यानं 20 हजारांची लाच मागितली होती आणि महिला तलाठ्यानं 6 हजारांची लाच मागितली होती. त्यामुळे ग्रामीण भागात आजही जमिनींचे शेतीचे व्यवहार करायला महसूल विभागाचे अधिकारीच कर्मचारी पैसे घेतात हेच यावरुन सिद्ध होतंय. राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्र्यांच्याच जिल्ह्यात ही अवस्था असेल तर इतर जिल्ह्यात काय परिस्थिती असेल याचा विचारच न केलेलाच बरा.

कोल्हापूर जिल्ह्यातील लाचेच्या  16 गुन्ह्यांचा तपशील -


महसूल विभाग - 7 गुन्हे

पोलीस विभाग - 2 गुन्हे

महापालिका - 1 गुन्हा

Loading...
Loading...

नगरविकास खाते - 2 गुन्हे

वनखाते - 1 गुन्हा

ग्रामविकास खाते - 1 गुन्हा

उद्योग व उर्जा विभाग - 1 गुन्हा

शिक्षण खाते - 1 गुन्हा.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या महसूल विभागातील 7 गुन्ह्यांपैकी कुणी लाच मागितली तेही पाहूयात..

मंडल अधिकारी - 2

तलाठी - 3.

कोतवाल - 1

लिपिक - 1.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 09:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close