The Burning Car: मुंबई-गोवा महामार्गावर कारमध्ये स्फोट, चालकाचा कोळसा

मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील बोरज गावाजवळ सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास धावत्या कारमध्ये भीषण स्फोट झाला. नंतर कारला आग लागली.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 01:24 PM IST

The Burning Car: मुंबई-गोवा महामार्गावर कारमध्ये स्फोट, चालकाचा कोळसा

रत्नागिरी, 19 जून- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील बोरज गावाजवळ सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास धावत्या कारमध्ये भीषण स्फोट झाला. नंतर कारला आग लागली. आग एवढी भीषण होती की, चालकाचा होरपळून मृत्यू झाला.मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की नजीकच असलेले बोरज गाव हादरले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. तसेच कार चालकाच्या मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला आहे. पाण्याच्या टँकरने आग विझवण्यात आली. या घटनेमुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. कारला स्फोटानंतर लागलेली आग विझवल्यानंतर कारमधील चालकाचा मृतदेह पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढला.गाडी कोणाची होती, चालक कोण होता, हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

पालघरमध्ये सख्खा भाऊ निघाली पक्का वैरी..

Loading...

पालघरमध्ये सख्खा भाऊ पक्का वैरी, या म्हणीचा प्रत्यय आला आहे. आपल्या मालकीच्या झाडवरील आंबे तोडल्याच्या रागातून भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिलीप पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी जयवंत पाटील त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण?

वाडा तालुक्यातील पालसईत येथे बुधवारी ही घटना घडली आहे. दिलीप पाटील यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे पाडले. याचा राग मनात धरून त्यांचा सख्खा भाऊ जयवंत पाटील यांनी जाब विचारत हातातील दांडक्याने दिलीप यांना बेदम मारहाण केली. यात दिलीप हे गंभीर जखमी झाले. दिलीप यांना वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दिलीप यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील जेजे हॉस्पिटलमध्ये नेण्यास डॉक्टरांनी सांगितले. मात्र, त्याआधीच दिलीप यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडा पोलीसस्टेशनमध्ये जयवंत पाटील व त्यांची पत्नी जयश्री जयवंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


SPECIAL REPORT: अबब! 20 नंबरचा बूट तुम्ही कधी पाहिलाय का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2019 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...