S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 8 महिन्याच्या बाळासह 5 जणांचा मृत्यू

रात्रीच्या सुमारास वेगात येणाऱ्या ट्रक आणि स्कॉर्पिओची जोरदार धडक झाली.

Updated On: Apr 15, 2019 09:44 AM IST

ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 8 महिन्याच्या बाळासह 5 जणांचा मृत्यू

बुलडाणा, 15 एप्रिल : बुलढाण्यामध्ये सोमवारची सकाळ धक्कादायक ठरली आहे. डोनगाव रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रात्रीच्या सुमारास वेगात येणाऱ्या ट्रक आणि स्कॉर्पिओची जोरदार धडक झाली. यामध्ये 5 जण जागीच ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी असल्याची माहीती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या अपघातामध्ये 8 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.

अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व जण बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील रहिवासी आहेत. घटनेची माहीती मिळताच स्थानिकांनी जखमींना नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर अपघाताची माहीत मिळताच बुलढाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


पोलिसांनी घटनास्थळावरून अपघाती वाहनं रस्त्याच्या बाजूला करण्यात आली आहे. तर अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असल्याचंही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी 5 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस आता या अपघाताचा कसून तपास करत आहेत.


VIDEO: आणि म्हणून मोदींऐवजी बारामतीत अमित शहा घेणार सभा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close