S M L

पालघर-माहिम रोडवर कारचा अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

पालघर-माहिम रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होती की कारमध्ये असलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 7, 2018 09:55 AM IST

पालघर-माहिम रोडवर कारचा अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

07 फेब्रुवारी : पालघर-माहिम रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होती की कारमध्ये असलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. माहीम रस्त्यावरील पाटीलवाडी रोडवर पानेरी नाल्याजवळ कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. आज पहाटे चार वाजल्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर जे. पी. शाळेच्या समोर हा अपघात झाला आहे. ही कार माहिमहून पालघरला जात होती. आणि यादरम्यान कारचा भिषण अपघात झाला आहे.

अपघातातील पाच मृतांपैकी एक वडराई येथील रहिवासी आहे तर अन्य चारजण तारापूर परिसरात राहतात. कारमधून हे सर्व प्रवासी माहिमहून पालघरच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अपघात इतका भीषण होता कि, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

माहीम येथील मृतांची नावे1)किरण परशुराम पागधरे (वय 30 वर्षे) -वडराई

2)निकेश मोहन तामोरे(वय 29)- तारापूर

3)संतोष बळीराम खानपाडा-पालघर

Loading...
Loading...

4)दिपेश पागधरे - सातपाटी

5)विराज अर्जुन वेताळ -पालघर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2018 09:55 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close