S M L

नागरी पूल बांधणं हे काही लष्कराचं काम नाही-कॅप्टन अमरिंदर सिंह

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म लष्कराची मदत घेण्यावर आक्षेप घेतलाय. 'युद्धाची तयारी करणं, हे लष्कराचं काम आहे, त्यांना नागरी कामांसाठी वापरू नका', असं ट्विट सिंग यांनी केलंय. ट्विटमध्ये त्यांनी सीतारमण यांना टॅगही केलंय. लष्कराला नागरी कामांसाठी वापरू नये या मताचा मी आहे, या अशा निर्णयांमुळे चुकीचे पायंडे पडतात, असं ते म्हणालेत

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 31, 2017 01:18 PM IST

नागरी पूल बांधणं हे काही लष्कराचं काम नाही-कॅप्टन अमरिंदर सिंह

मुंबई, 31 ऑक्टोबर:मुंबईत रेल्वेचे पूल बांधण्यासाठी लष्कराला पाचारण केले गेले आहे. यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आक्षेप घेतला आहे. लष्कर हे काही रेल्वेचे पूल बांधण्यासाठी नाही असं अमरिंदर सिंहांचं म्हणणं आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म लष्कराची मदत घेण्यावर आक्षेप घेतलाय. 'युद्धाची तयारी करणं, हे लष्कराचं काम आहे, त्यांना नागरी कामांसाठी वापरू नका', असं ट्विट सिंग यांनी केलंय. ट्विटमध्ये त्यांनी सीतारमण यांना टॅगही केलंय. लष्कराला नागरी कामांसाठी वापरू नये या मताचा मी आहे, या अशा निर्णयांमुळे चुकीचे पायंडे पडतात, असं ते म्हणालेत. तसंच चीन युद्धाच्या आधी जनरल कौल यांनीही असंच काम केलं होतं.यामुळे खूप वाईट पद्धत पडेल असंही ते म्हणाले.

पण तरी नक्की लष्कराची मदत का घेतली जाते आहे हे एकदा जाणून घेऊयापाहूयात लष्कराची मदत घेण्यामागची प्रमुख कारणं कोणती.

- कमी वेळात काम पूर्ण करण्यात हातखंडा

- अचूक काम करून देण्याची लष्कराची ख्याती

Loading...

- टेंडर प्रक्रियेला फाटा देता येतो

- कामाच्या दर्जाबद्दल शंका नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 01:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close