रत्नागिरीच्या 'या' गावात सापडली ऐतिहासिक वस्तू!

ही पुरातन काळातली तोफ असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांची विशेष बातमी.

  • Share this:

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी गावात आमनायेश्वर मंदिरालगत खोदकाम करत असताना ऐतिहासिक धातूची वस्तू सापडली आहे. या वास्तूचे वजन 100 किलोच्या दरम्यान असून साधारण पाच फूट रुंद अशी लांबी आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी गावात आमनायेश्वर मंदिरालगत खोदकाम करत असताना ऐतिहासिक धातूची वस्तू सापडली आहे. या वास्तूचे वजन 100 किलोच्या दरम्यान असून साधारण पाच फूट रुंद अशी लांबी आहे.

 प्राथमिक अंदाजानुसार, ही पुरातन काळातली तोफ असावी अशी शक्यता वर्तवली जात असून कळंबुशी गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे शासनाने ही तोफ आमच्या मंदिर परिसरात ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी इथले ग्रामस्थ करत आहेत.

याच गावात आमनायेश्वरचे पांडवकालीन मंदीर असून हे पांडवांनी एका रात्रीत बांधले असल्याची आख्यायिका आहे.

 शिवकालीन इतिहासात संगमेश्वरचे नाव अधोरेखित आहे. त्यामुळे आता सापडलेल्या या तोफ नेमकी कोणत्या कालखंडातली असावी याबाबत संभ्रम आहे.

 दरम्यान, ही पुरातन तोफ सापडल्यापासून गावात हजारोंच्या संख्येनं लोकं तोफ पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.

 शिवाय ही तोफ सापडल्यामुळे कळंबुशी गावाच्या वैभवात आणखी भर पडल्यामुळे येथील ग्रामस्थ आनंदात आहेत.

 त्यामुळे, या तोफेचा इतिहास शासनाने तपासल्यावर ती पुन्हा गावातच जतन आणि संवर्धन करण्यासाठी द्यावी अशी मागणी ग्रामस्थ पुरातत्व विभागाकडे करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 07:50 PM IST

ताज्या बातम्या