पुण्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिल्यांच्या आरोग्याशी खेळ, कॅल्शिअमच्या गोळ्याच नाही उपलब्ध!

पुण्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिल्यांच्या आरोग्याशी खेळ, कॅल्शिअमच्या गोळ्याच नाही उपलब्ध!

गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांना आवश्यक असलेल्या कॅल्शिअमच्या गोळ्याच काही महिन्यांपासून उपलब्ध नाही आहेत.

  • Share this:

19 डिसेंबर : खेडेगावातल्या महिला डोंगर दऱ्यांमध्ये कष्ट करतात. अगदी गर्भवती काळातही सगळ्या वेदना सहन करत त्या दऱ्या-खोऱ्यात काम करत असतात, पण अशावेळी त्यांना गरज असते ती प्राथमिक आरोग्य केंद्राची. पण गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांना आवश्यक असलेल्या कॅल्शिअमच्या गोळ्याच काही महिन्यांपासून उपलब्ध नाही आहेत.

गर्भवती काळात कॅल्शिअमची औषधं मिळाली नाही तर बाळाला आणि आईला धोका होऊ शकतो. त्यातच बाळ आणि माता वेगवेगळ्या आजारांच्या शिकारही होऊ शकतात. त्यामुळे गर्भवती महिलांच्या आरोग्याशी अशा प्रकार केला जात असलेला खेळ खरंच खूप गंभीर आहे.

सरकारच्या विविध योजनांमधून आपल्याला संपूर्ण प्रसूती मिळणार ही आशा या महिलांना असते मात्र याच महिलांच्या गर्भवती काळात लागणारी औषधे वेळोवेळी उपलब्ध होतं नाही असं इथल्या डॉक्टरांचंच म्हणणे आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत चालणारे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिस्थितीचा सामना या गोरगरीब महिलांना करावा लागतो. गर्भवती मातांसाठी शासनाच्या अनेक योजना कार्यरत आहे त्यासाठी अनेक शिबीरंही घेतली जातात, मार्गदर्शनही होत असतं मात्र या योजना योग्य पद्धतीने राबवुन औषध पुरवठा का होत नाही हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2017 09:49 AM IST

ताज्या बातम्या