S M L

विदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून

विदर्भात मुसळधार पावसामुळे पन्नास हजार हेक्टरमधील पीके उद्धस्त झाली असून, हजारो एकर शेत जमीन खरडून गेल्याने शेतकर्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2018 06:01 PM IST

विदर्भात 50 हजार हेक्टरवरील पीके उद्धस्त; हजारो एकर शेत जमीन गेली खरडून

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 21 ऑगस्ट : विदर्भात गेल्या चार पाच दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे पन्नास हजार हेक्टरमधील पीके उद्धस्त झाली आहे तर हजारो एकर शेत जमीन खरडून गेल्याने शेतकर्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. एरवी खरीपाचा हंगाम गेला तर रब्बीकडून अपेक्षा ठेवली जाते. पण या खरडून गेलेल्या जमिनीमध्ये शेतीच कसणं बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विदर्भात यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली, अकोला आणि नागपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकणच्या शिवारातील जमीन खरडून गेली आहे. यामुळे शेकडो एकर जमीन बाधित झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.

या पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहिल्याने काठावरच्या शेतजमिनींना तलावांचे स्वरुप आले आहे. मातीचा 1 इंच थर तयार व्हायला किमान 500 वर्षांचा कालावधी लागतो. पण, गेल्या चार पाच दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर तसंच नांदेड आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये किमान 3 ते 4 इंच शेतजमीन, तर काही ठिकाणी दीड ते दोन फुटांपर्यंत सुपीक जमीनी खरडल्या गेली आहे.एरव्ही खरीपाचा हंगाम गेला तर रब्बीकडून अपेक्षा ठेवली जाते. पण आता या खरडून गेलेल्या जमिनीमध्ये शेतीचं कसणंच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुपीक मातीचं झालेलं नुकसान भरुन न येण्याचीच शक्यता जास्त आहे. अशा खरडेल्या शेतजमिनी ज्या तालुक्यांत आहेत, तिथे जलसंधारणाच्या कामातून जमीनीचा पोत सुधारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असून, तो विदर्भातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा ठरेल अशी माहिती आणि विभागीय कृषी संचालक रविद्र भोसले आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संचालक विलास खर्चे यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

दरम्यान, राज्य सरकार 'एनडीआरएफ'च्या माध्यमातून शेती खरडल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करतय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2018 05:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close