S M L

...पण ओबीसीसाठी काम केलेच पाहिजे, भुजबळांचं खडसेंना उत्तर

खडसे यांचा मी आभारी असून ते देखील अनेक वर्षांपासून ओबीसी समाजासाठी काम करीत आहे

Sachin Salve | Updated On: Jun 15, 2018 10:34 PM IST

...पण ओबीसीसाठी काम केलेच पाहिजे, भुजबळांचं खडसेंना उत्तर

येवला, 15 जून : एकनाथ खडसे यांचा मी आभारी आहे. कोणी कोणत्याही पक्षात असले तरी चालेल मात्र ओबीसीसाठी काम केलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

...तर भुजबळांसोबत एकत्र येईल-एकनाथ खडसे

ओबीसी चळवळीमध्ये मी छगन भुजबळ यांच्या सोबत आहे असं सांगून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली इच्छा बोलून दाखवली होती. एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, खडसे यांचा मी आभारी असून ते देखील अनेक वर्षांपासून ओबीसी समाजासाठी काम करीत आहे त्यांनी हाऊसमध्ये ही या बाबत वेळोवेळी आवाज उठवला आहे अशी आठवण भुजबळांनी काढली.

तसंच मी ओबीसीसाठी 1991 पासून काम करत आहे. माझ्यासोबत गोपीनाथ मुंडे यांनीही काम केलं आहे. आता खडसे काम करत आहे. सर्वच जातीचे काम केले पाहिजे  तसंच ओबीसीमध्ये चारशेहून अधिक जाती आहे. त्यामुळे कोणी कोणत्याही पक्षात असले तरी चालेल मात्र ओबीसीसाठी काम केलेच पाहिजे असं भुजबळ येवला येथे दौऱ्यावर आले असताना बोलले.

राज्यातल्या मंत्र्यानेच रचला माझ्याविरूद्ध कट - खडसेंचा गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2018 10:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close