RSSच्या संघशिक्षा वर्गाच्या समारोपाला उद्योगपती रतन टाटा येणार?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोपाला प्रख्यात उद्योगपती रतन टाटा येण्याची शक्यता आहे. संघाच्या रेशिमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती येथे आयोजित संघाच्या वर्गाचा 17 जूनला समारोप आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 06:17 PM IST

RSSच्या संघशिक्षा वर्गाच्या समारोपाला उद्योगपती रतन टाटा येणार?

नागपूर, 25 मे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोपाला प्रख्यात उद्योगपती रतन टाटा येण्याची शक्यता आहे. संघाच्या रेशिमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती येथे आयोजित संघाच्या वर्गाचा 17 जूनला समारोप आहे. या समारोपीय कार्यक्रमासाठी संघाकडून रतन टाटा यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. गेल्यावर्षी याच कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे माजी नेते प्रणव मुखर्जी यांना संघाने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.

पुणे तिथे काय उणे.. कोंबडा भल्या पहाटे आरवतो, झोपमोड होते म्हणून पोलिसांत तक्रार

रतन टाटा यांनी चार वेळा संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यापूर्वी उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा उद्योग समुहाकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पाँन्सिबिलीट अंतर्गत संघाच्या सामाजिक कार्यास मदत करण्यासंदर्भात भेटी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोपाला रतन टाटा येणार असल्याची शक्यता आहे. या वेळेस रतन टाटा यांना संघस्थानावर बोलाविण्यासाठी संघाकडून निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बापलेक जमिनीवर कोसळले, मुलाचा जागीच मृत्यू

रतन टाटांनी घेतली सरसंघचालकांची भेट

Loading...

दरम्या, रतन टाटा यांनी 17 एप्रिलला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली होती. ही भेट संघाकडून गोपनीय ठेवण्यात आली होती. सकाळी १०.३० च्या सुमारास टाटा यांनी संघ मुख्यालयात डॉ.भागवत यांची भेट घेतली व त्यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. याअगोदर 28 डिसेंबर 2016 रोजी टाटा यांनी अचानकपणे संघ मुख्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर 2018 मध्येदेखील त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती.


पराभवानंतर अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत, पाहा UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 06:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...