व्यापाऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला, गंभीर जखमी

पवन गुप्ता असं हल्ला झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. या हल्ल्यात पवन गुप्ता गंभीर जखमी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2019 01:07 PM IST

व्यापाऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला, गंभीर जखमी

उल्हासनगर, 18 मार्च : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वादातून व्यापाऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उल्हासनगर घडली आहे. पवन गुप्ता असं हल्ला झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. या हल्ल्यात पवन गुप्ता गंभीर जखमी झाले आहेत.

उल्हासनगरमधील अमन टॉकीज रोड या ठिकाणी पवन उर्फ जीत गुप्ता यांचे ज्यूस सेंटर आहे. त्यासाठी पवन याने रोशन माखीजा याच्याकडून काही दिवसांपूर्वी व्याजावर एक लाख रुपये घेतले होते. ते परत करण्यासाठी रोशन माखीजा यांनी पवनकडे तगादा लावला होता.

रोशन माखीजाकडे पवनचा धनादेश असल्याने तो परत केल्यावर तुला पैसे देतो असे पवन याने सांगितले. परंतु पवन आपले पैसे परत करत नसल्याचा राग मनात धरून रोशन माखिजा व त्याच्या इतर तीन साथीदारांनी तीक्ष्ण हत्यारांच्या साहाय्याने पवनवर जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात पवन गुप्ता गंभीर जखमी झाला असून याची प्रकृती चिंताजनक असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.


Loading...

SPECIAL REPORT: नेते राजकारणात मश्गुल; निवडणुका जात आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून दूर



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 01:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...