संपादरम्यान अहमदनगर प्रशासनाने केली वाहनांची सोय

अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एसटी सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत.त्यामुळे स्कूल बसेसची सोय नगर प्रशासनाने केली आहे.नगर शहरातून 10 बसेस वेगवेगळ्या ठिकाणी सोडण्यात आल्या आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2017 03:55 PM IST

संपादरम्यान अहमदनगर प्रशासनाने केली वाहनांची सोय

अहमदनगर,19 ऑक्टोबर: राज्यभर एसटी प्रशासनाची प्रचंड गैरसोय झाली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा प्रशासनाने एसटी संपादरम्यान गैरसोय टाळण्यासाठी वाहनांची सोय केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एसटी सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत.त्यामुळे स्कूल बसेसची सोय नगर प्रशासनाने केली आहे.नगर शहरातून 10 बसेस वेगवेगळ्या ठिकाणी सोडण्यात आल्या आहेत. इंडस वर्ल्डला 2 बसेस, यशश्री अकॅडमीला 2 बसेस, मेहरबाबा ट्रस्टला 2 बसेस, अहमदनगर महापालिकेच्या 3 बसेस याप्रमाणे उपलब्धता आहे.

याशिवाय शेवगाव, पाथर्डी आणि पुण्याकरता बसेसची जास्त मागणी आहे, त्याप्रमाणे बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे तालुकानिहाय स्कूल बसेसची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात तालुका निहाय स्कूल बसेस

अकोले - 35

Loading...

संगमनेर - 73

कोपरगाव - 32

राहता - 62

श्रीरामपूर - 19

राहुरी - 92

नेवासा - 38

शेवगाव - 19

पाथर्डी - 8

जामखेड - 7

कर्जत - 6

श्रीगोंदा - 31

पारनेर - 85

नगर - 21 मनपा - 23 एकूण = 551

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2017 02:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...