धावत्या एसटीत ड्रायव्हरचा हार्ट अॅटॅकने मृत्यू, बसच्या धडकेत दोन ठार

कोल्हापूरहून गारगोटीला जाणारी एसटी उमा टॉकीज चौकात आल्यावर चालकाला अचानक हार्ट अॅटॅक आला आणि या एसटीने चौकातल्या 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक दिली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 24, 2017 07:24 PM IST

धावत्या एसटीत ड्रायव्हरचा हार्ट अॅटॅकने मृत्यू, बसच्या धडकेत दोन ठार

24 मे : कोल्हापूर शहरात एसटी चालकाला अचानक अॅटॅक आल्यानं झालेल्या अपघातात चालकासह 2 जण ठार झाले. आज संध्याकाळी कोल्हापूर शहरातल्या उमा टॉकीज चौक परिसरात ही घटना घडलीय.

कोल्हापूरहून गारगोटीला जाणारी एसटी उमा टॉकीज चौकात आल्यावर चालकाला अचानक हार्ट अॅटॅक आला आणि या एसटीने चौकातल्या 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये एक वाहनधारक जागीच ठार झालाय. तर अॅटॅकनं चालकाचाही मृत्यू झालाय.

या अपघातात अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. शहरातल्या गजबजलेल्या चौकात हा अपघात घडल्यावर एसटी बस एका दुकानाच्या भींतींवर जाऊन आदळून थांबल्यानं मोठा अनर्थ टळलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2017 07:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...