S M L

नवस फेडायला गेलेल्या भाविकांची बस 100 फुटांवरून पंचगंगा नदीत कोसळली

शिवाजी पुलावरून मिनी बस 100 फूट खाली कोसळली पंचगंगा नदीत कोसळून अपघात झाला. यात अपघातात चिमुरडीसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2018 11:02 AM IST

नवस फेडायला गेलेल्या भाविकांची बस 100 फुटांवरून पंचगंगा नदीत कोसळली

27 जानेववारी : पंचगंगा नदीवर काल मध्यरात्री भिषण अपघात झाला. शिवाजी पुलावरून मिनी बस 100 फूट खाली कोसळली पंचगंगा नदीत कोसळून अपघात झाला. नवस फेडण्यासाठी हे सगळे भाविक गेले होते आणि तिथून परतताना त्यांची बस नदीत कोसळली. यात अपघातात चिमुरडीसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. या मिनीबसमध्ये 16 प्रवासी प्रवास करत होते. त्यात रात्री बेपत्ता झालेल्या 9 महिन्याच्या बाळाला शोधण्यात यश आलं आहे. मध्यरात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातातले मृत पुण्याच्या बालेवाडी आणि पिरंगुटचे रहिवाशी असल्याचं सांगण्यात येत आहे. पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावरून टेम्पो ट्रॅव्हलर बस खाली नदीत कोसळली. यात काही महिलांचाही समावेश आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी दोन क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सीपीआर रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत या घटनेत मृत्यू झालेल्यांची संख्या 13वर गेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांनी शिवाजी पूल, सीपीआर रूग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे.

अपघातातीत मृतांची नाव

संतोष बबनराव वरखडे (45)

गौरी संतोष वरखडे (16)

ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (14)

सचिन भरत केदारी (34)

नीलम सचिन केदारी (28)

संस्कृती सचिन केदारी (8)

सानिध्य सचिन केदारी (9 महिने)

भावना दिलिप केदारी (35)

साहिल दिलीप केदारी (14)

श्रावणी दिलीप केदारी (11)

छाया दिनेश नागरे (41)

प्रतिक दिनेश नागरे (14)

अपघातातील जखमींची नावं

मनिषा संतोष वरखडे (38 )

प्राजक्ता दिनेश नांगरे (18)

मंदा भरत केदारी (50)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2018 08:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close