औरंगाबादेत बसला अपघात; 3मृत 6 जखमी

आज एसटी बसने 2 रिक्षांना धडक दिली . यामुळे 2 जण जागीच ठार झाले.तर 5 ते 6 जखमी लोक जखमी झाले.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2017 09:56 PM IST

औरंगाबादेत बसला अपघात; 3मृत 6 जखमी

 औरंगाबाद,16 ऑक्टोबर :  आज औरंगाबादेत सिडको बस स्टोप परिसरात एका बसला भीषण अपघात झाला आहे. या बस अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर 6 जण जखमी झाले आहे.

औरंगाबादच्या सिडके बस स्टोपला बाहेरून अनेक गाड्या येत असतात. त्यामुळे याभागात बऱ्यापैकी वर्दळ असते. अशावेळी  एसटी बसने 2 रिक्षांना धडक दिली. यामुळे 2 जण जागीच ठार  झाले.तर 5 ते 6 जखमी लोक जखमी झाले. कारला धडक लागल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने एका रिक्षाला धडक दिली.यामुळे अधिक लोक जखमी झाले आहेत.  दरम्यान जखमींना औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.बसचे ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे.य़ाआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत,

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...