S M L

अहमदनगरच्या इमामपूर घाटात 'बर्निंग बस'

अहमदनगरला धावत्या बसच्या इंजिननं शॉर्ट सर्किट झाल्यानं अचानक पेट घेतला.

Sonali Deshpande | Updated On: Apr 19, 2017 12:25 PM IST

अहमदनगरच्या इमामपूर घाटात 'बर्निंग बस'

19 एप्रिल : अहमदनगरला धावत्या बसच्या इंजिननं शॉर्ट सर्किट झाल्यानं अचानक पेट घेतला. बस घाटातून चढताना इंजिन गरम होऊन वायरिंगच्या स्पार्किंगनं आग भडकली.

काही क्षणातच आग भडकून इतरत्र पसरायला लागली. भयभीत झालेल्या ३७ प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडून जीव वाचवला.

इमामपूर घाटात आठ वाजण्याच्या सुमारास नेवासा नगर बसनं पेट घेतला. बस पेटल्यानं केबिनसह गाडीचं मोठं नुकसान झालंय. बस पेटल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आणि अग्निशमन दलानं त्वरित घटनास्थळी धाव घेतली. परिसरातल्या नागरिकांच्या मदतीनं त्वरित आग नियंत्रित केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2017 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close