महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा

यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून अधिसूचना काढून नियम अटी प्रसिध्द झाल्यानंतर बैलगाडा शर्यती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने घेता येतील.

  • Share this:

26 जुलै: महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून या विधेयकास कायदेशीर मान्यता मिळाली आहे.यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून अधिसूचना काढून नियम अटी प्रसिध्द झाल्यानंतर बैलगाडा शर्यती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने घेता येतील. हे विधेयक पारित झाल्यानंतर बैलगाडी मालकांनी आज जल्लोष करून या निर्णयाचे स्वागत केले.

या कायद्यानुसार बैलगाडा शर्यत घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यावर या शर्यती घेता येणार नाहीत. तसंच या शर्यतीमध्ये जर एखाद्या मानसामुळे बैल जखमी झाला आणि या प्रकरणात तो दोषी आढळल्यास त्याला 5 लाखाचा दंड किंवा तीन वर्ष तुरूंगवास ठोठावला जाईल. महाराष्ट्र सरकारने हा कायदा 6 एप्रिललाच संमत केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2017 06:08 PM IST

ताज्या बातम्या