S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

यमद्वितीयेला रंगल्या रेड्यांच्या झुंजी

आज नांदेड, मनमाड, औरंगाबाद ठिकठिकाणी अशा रेड्यांची झुंज लावली गेली.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 21, 2017 07:43 PM IST

यमद्वितीयेला रंगल्या रेड्यांच्या झुंजी

21 ऑक्टोबर: आज यमद्वितीया!गेल्या अनेक वर्षांपासून गवळी समाजाच्या वतीनं आजच्या दिवशी ठिकठिकाणी रेड्याची पूजा केली जाते.

दिन-दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं म्हणत वसूबारसेला गुरा-ढोरांची पूजा करुन पशुधनाप्रती आपण आपलं ऋण व्यक्त करतो. पाडव्याला आणि यमद्वितीयेला रेड्याला आकर्षक पद्धतीनं सजवून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढून त्याला देवदर्शनाला घेऊन येतात. त्यानंतर रेड्यांची झुंज लावली जाते. रेड्यांची ही झुंज जोपर्यंत लावत नाहीत, तोवर आमची दिवाळी साजरी होत नाही, असं गवळी समाज मानतो. आज नांदेड, मनमाड, औरंगाबाद ठिकठिकाणी अशा रेड्यांची झुंज लावली गेली.

मनमाड शहरात पाडव्याच्या दिवशी गवळी बांधव आपल्या रेड्याला आकर्षक पद्धतीने सजवून वाजत गाजत त्याची मिरवणूक काढून त्याला देवदर्शनाला घेऊन येतात त्यानंतर भाऊबीजच्या दिवशी या रेड्यांची झुंज लावली जाते आज शहरातील वाघदर्डी रोड वरील मैदानावर रेड्यांची टक्कर लावण्यात आली होती या स्पर्धेत अनेक रेडे सहभागी झाले होते .रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.जो पर्यंत आम्ही रेड्यांची झुंज लावत नाही तो पर्यंत आमची दिवाळी साजरी होत नाही असे गवळी बांधव सांगतातगवळी समाज दूध दुभणाऱ्या म्हशीच्या प्रति ऋण व्यक्त कारण्यासाठी म्हैस,रेडा यांना सजवतो. त्यांची मिरवणूक काढतो. गेली 40 वर्षे पुण्यात गणेश पेठेत दूधभट्टी येथे सगर वाजत गाजत साजरी होते.

मिरवणूक पाहायला तुफान गर्दी होते. हल्ली भेसळयुक्त दुधाचा प्रसार वाढलाय. तसंच अनेक ब्रँड बाजारात आलेत . त्यामुळं थेट गवळी बांधवांकडुन धारोष्ण दूध घ्यायचं प्रमाण घटतंय.

यासोबतच भावा बहिणीच्या नात्याचा अतूट सण म्हणजे भाऊबीज देखील आजच असतो. हा सणही आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. आपल्या लाडक्या भाऊरायाला बहिणींनी घरोघरी ओवाळलं. हा दिवस दिवाळीचा शेवटचा दिवस असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 07:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close