News18 Lokmat

चारा खाऊ घालणाऱ्या बैलाने चेहऱ्यात खुपसले शिंग, वृद्ध महिलेचा मृत्यू

वसंतवाडी गावात राहणाऱ्या सयाबाईंनी नेहमीप्रमाणे आपल्या बैल जोडीला चारा टाकला.

News18 Lokmat | Updated On: Jan 8, 2019 06:02 PM IST

चारा खाऊ घालणाऱ्या बैलाने चेहऱ्यात खुपसले शिंग, वृद्ध महिलेचा मृत्यू

राजेश भागवत, प्रतिनिधी

जळगाव, 09 जानेवारी : बैलाने शिंग खुपसल्याने सयाबाई पाटील या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यातील वसंतवाडी गावात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आपली जनावरे सांभाळणे कठीण बनले आहे, अशा कठीण काळात देखील मोठ्या जिवाभावाने आपल्या बैल जोडीला चारा-पाणी करणाऱ्या सयाबाई पाटील यांना त्यांच्याच बैलाने शिंग खुपसल्याने मृत्यू झाला आहे.

वसंतवाडी गावात राहणाऱ्या सयाबाईंनी नेहमीप्रमाणे आपल्या बैल जोडीला चारा टाकला. त्यानंतर त्यांच्या जवळ साफसफाई करीत असताना, एका बैलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, बैलाने त्यांच्या चेहऱ्यातच शिंग खुपसले आणि त्यांचा चेहराच फाडला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या दोन वर्षांपासून या बैल जोडीला सयाबाई नियमितरित्या चारापाणी करून त्यांची काळजी घेत होत्या. मात्र, काळजी घेणाऱ्या बैलानेच त्यांचा असा अचानक हल्ला करून जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (सांकेतिक छायाचित्र)

Loading...

=====================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...