चक्क पशु वैद्यकीय दवाखान्यात दारू आणि मटणाची पार्टी

इतर दोन डॉक्टरांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्नदेखील केला.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2018 03:21 PM IST

चक्क पशु वैद्यकीय दवाखान्यात दारू आणि मटणाची पार्टी

बुलडाणा, २९ जुलैः बुलडाणा जिल्ह्यातील पशु वैद्यकीय चिकित्सलयाच्या इमारतीत सुट्टीच्या दिवशी पशु वैद्यकीय अधिकारी आपल्या डॉक्टर मित्रांसह मटण व दारूची पार्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार शेगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. शेगाव येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.के. वाघूरवाघ हे आपल्या इतर दोन डॉक्टर मित्रांसह बुलडाणा येथील पशु वैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीत चक्क मटण व दारूच्या पार्ट्या करत असल्याचं गावात अनेक दिवसांपासून चर्चा होती. काल २८ जुलै, शनिवारी सरकारी सुट्टीच्या दिवशी दुपारी डॉक्टर अधिकारी इमारतीला बाहेरून कुलूप लावून आत चक्क दारूच्या पार्ट्या रंगवत होते. पत्रकारांना यासंबंधी माहिती मिळता ते तेथे पोहोचले. कार्यलयीन कामं करत असल्याचा बनाव त्या अधिकाऱ्यांनी केला. मात्र थोड्याच वेळात अधिकाऱ्यांना दारू पार्टी करत असल्याचे मान्य करत, आमचं कोणीही काही करु शकत नसल्याचे सांगितले. दरम्यान इतर दोन डॉक्टरांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्नदेखील केला.

हेही वाचा-

दापोली अपघात- ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले, २५ तासांनी बचावकार्य पूर्ण

नरेंद्र मोदींबद्दल कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य

पुण्यात गांज्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...