बुलडाणा, नाशिकसह रत्नागिरी जिह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

बुलडाणा, नाशिकसह रत्नागिरी जिह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

रविवारी बुलडाणा, नाशिकसह रत्नागिरी जिह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.

  • Share this:

मुंबई, 4 नोव्हेंबर : रविवारी बुलडाणा, नाशिकसह रत्नागिरी जिह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवाळी तोडावर असताना यी तिन जिल्ह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती आहे. तर पुढच्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.

रविवरी बुलडाणा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बुलडाणा शहरात आनंदाचे वातवरण निर्माण झालंय. गेल्या अनेक दिवसांपासून उकडा सहन करणाऱ्या बुलडाणेकरांना या पावसामुळे चांगला दिलासा मिळाला. 15 मिनिट झालेल्या हा पाऊस शहरातील काही भागाला ओल चिंब करून गेला.

नाशिकमध्येही रविवीरी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची अक्षरशः तारंबळ उडाली. पावसामुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड परिसरात व्यापाऱ्यांचेही हाल झाले. नाशिक शहरासह आजुबाजुच्या गावांमध्ये तासभर पाऊस झाल्याची माहिती आहे.

तर रत्नागिरीतल्या चिपळुण आणि खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. परतीच्या पावसामुळे दिवाळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ.

अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर अनेक व्यापाऱ्यांचे आकाशकंदील, दिवे पणत्या, फटाक्यांची रस्त्यावरून दुकानं पावसामुळे भिजली. त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी दिवाळीची खरेदी करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलंय.


दोन दिवसात महाराष्ट्रात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात पावसाबाबत हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच 6 तारखेनंतर गोव्यासह महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


मुंबईकरांच्या आयुष्यातील सर्वात हॉट दिवस

ऑक्टोबर हिटमधून मुंबईकरांची नुकतीच सुटका झाली. पण 3 नोव्हेंबर हा दिवस गेल्या 15 वर्षातील नोव्हेंबर महिन्यातला सर्वात जास्त तापमान असलेला दिवस ठरला. मुंबईमध्ये शनिवारी 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली गेली. गेल्या 15 वर्षातील नोव्हेंबर महिन्यातलं मुंबईमधील हे सर्वात जास्त तापमान आहे. याआधी 2003 मधील नोव्हेंबर महिन्यात 37.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं होतं.


जोडप्याला पोलिसांनी बेदम मारलं, VIDEO झाला व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2018 08:22 PM IST

ताज्या बातम्या