S M L
Football World Cup 2018

बुलडाणा:आंतरजातीय लग्न केलं म्हणून बापाने मुलीला ठार मारलं

Sachin Salve | Updated On: Apr 5, 2017 06:13 PM IST

बुलडाणा:आंतरजातीय लग्न केलं म्हणून बापाने मुलीला ठार मारलं

05 एप्रिल : जातीबाहेर लग्न केल्यानं एका सैतान बापानं मुलीची हत्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यात घडलीये. धनगर असलेल्या मनिषा हिने मराठा समाजातल्या गणेश हिंगणेंशी लग्न केलं. यामुळे पेटून उठलेल्या मनिषाच्या सैतान बापानं तिला आयुष्य़ातूनच उठवलं

बुलडाण्यात जातीबाहेर लग्न केल्यानं एका बापानं पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केलीये. मनिषा हिंगणे असं या नवविवाहितेचं नाव आहे. धनगर समाजाच्या मनिषानं निमखेडी गावातल्याच मराठा समाजाच्या गणेश हिंगणे याच्याशी लग्न केलं. पंधरा दिवसापूर्वी मनिषा आणि गणेशचं लग्न झालं. मुलीनं समाजाबाहेर लग्न केल्यानं पेटून उठलेल्या बाळू हिवरे यानं गणेशच्या घरात कोणी नसताना मनिषावर सपासप वार केले. गंभीर जखमी मनिषाला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तोपर्यंत उशीर झाला होता.

केवळ दुसऱ्या जातीतल्या तरुणाशी लग्न केल्यानं एक बाप मुलीच्या जीवावरच उठलाय. खोट्या प्रतिष्ठेपोटी पोटच्या मुलीच्या गळ्यावर सुरी फिरवणाऱ्या या सैतानांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close