S M L

शेतकरी पुन्हा आक्रमक, उद्धस्त केली टोमॅटो आणि वांग्याची शेती! व्हिडिओ व्हायरल

शेतमालाला हमी भाव मिळत नसल्यानं बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात बोरी गावाच्या एका शेतकऱ्यानं आपली वांगी आणि टोमॅटोची शेती उद्धस्त केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होत आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 26, 2018 10:07 AM IST

शेतकरी पुन्हा आक्रमक, उद्धस्त केली टोमॅटो आणि वांग्याची शेती! व्हिडिओ व्हायरल

26 मार्च : जालना जिल्ह्यात एका शेतकऱ्यांने आपली शेती स्वत:च्या हाताने उद्धस्त करतानाचा व्हिडिओ आपण पाहिला असाल. त्याप्रमाणेच आपल्या शेतमालाला हमी भाव मिळत नसल्यानं बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात बोरी गावाच्या एका शेतकऱ्यानं आपली वांगी आणि टोमॅटोची शेती उद्धस्त केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर वेगाने व्हायरल होत आहे.

संजय बचाटे असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकून प्रेरित होऊन या शेतकऱ्यानं आपली चार चाकी विकली आणि आपल्या एक एकर शेतात पालेभाज्यांची लागवड केली. सुदैवाने त्याला पीकही चांगलं मिळालं. पण या आलेल्या पिकाला मात्र कवडी मोल भाव मिळत असल्याने संतप्त होऊन या शेतकऱ्याने आपली वांगे अन टमाट्याची शेती उपटून फेकली आहे.

बरं इतकंच नाही तर यानंतर कोणत्याही नेत्याच्या भाषणावर विश्वास ठेवणार नाही आणि ते फक्त आश्वासन देतात असं संजय यांने बोलून दाखवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2018 10:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close