इमारतीचा स्लॅब थेट हॉस्पिटलवर कोसळला, 2 महिलांसह एका चिमुकलीचा मृत्यू

दुर्घटनेची महिती मिळताच अग्निशनम दल आणि पालिकेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढलं.

News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2019 05:33 PM IST

इमारतीचा स्लॅब थेट हॉस्पिटलवर कोसळला, 2 महिलांसह एका चिमुकलीचा मृत्यू

उल्हासनगर, 3 फेब्रुवारी : इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिला आणि एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची आहे. तर यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

उल्हासनगरमधील इंदिरा मार्केट परिसरातील मेमसाब अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्याचा स्लॅब पहिल्या माळ्यावर तर पहिल्या माळ्याचा स्लॅब हा तळ मजल्यावरील हॉस्पिटलवर कोसळला. दुर्घटनेची महिती मिळताच अग्निशनम दल आणि पालिकेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढलं.

दरम्यान, दुर्घटना घडलेल्या इमारतीमधील लोकांना बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली आहे. इमारत सील करण्याचे काम सुरू आहे. उल्हासनगर शहरात 20 ते 25 वर्ष जुन्या अशा अनेक इमारती असून त्या जर्जर झाल्या आहेत.

मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न आता दिवसांदिवस गंभीर होत चालला आहे. अशा इमारती कोसळून होणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याबाबत पालिकेकडून काही पाऊलं उचलली जातील का, हे पाहावं लागेल.


Loading...

VIDEO: ...जेव्हा मोदींच्याच स्टाईलमध्ये राहुल गांधी म्हणतात, 'चौकीदार चोर है'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2019 05:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...