वाशिम, 17 सप्टेंबर - वाशिमचे जवान सुनील ढोपे यांचं पार्थिव आज कारंजा तालुक्यातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलंय. मात्र कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिलाय. सुनील ढोपे यांची हत्या झाली असल्याचा कुटुंबियांचा आरोप असून, जोवर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा कुटुंबियांनी दिलाय. दरम्यान, संध्याकाळी 6 वाजल्यानंतर सलामी देता येत नसल्यानं अखेर उद्या जवान सुनील ढोपे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर आज या घटनेच्या निषेधार्थ कारंजा शहर बंद ठेवण्यात आलं होतं.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी बीएसएफ जवान सुनील ढोपे यांची 15 सप्टेंबर रोजी हत्या झाली. त्याच्याच निषेधार्थ सोमवारी कारंजा शहर बंद ठेवण्यात आलं होतं. बंद काळात कारंजावासियांनी दोषी अधिकाऱ्याचा प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान धोपे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात हत्या झाल्याची तक्रार दाखल केली असून जोवर दोषीवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. कुटुंबियांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे जवान सुनील ढोपे यांचं पार्थिव शहरातील एका मैदानात ठेवण्यात आला असल्याची माहिती आहे.
दरम्यान, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, पोलीस अधिक्षिका मोक्षदा पाटील यांनी ढोपे परिवाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळी 6 वाजे नंतर फायरिंग सलामी देता येत नसल्यामुळे जवान सुनील ढोपे यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.
दहशतवादाविरोधात सहा देशांच्या लष्करी सरावाचा चित्तथरारक VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा