PUBG Game खेळण्यास मनाई केल्याने धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

आईच्या मोबाइलवर पबजी गेम खेळण्यास मनाई केल्याने 15 वर्षीय अल्पवयीन धाकट्या भावाने आपल्या 19 वर्षीय थोरल्या भावाच्या पोटात कैची खोपसून निर्घृण हत्या केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 07:25 PM IST

PUBG Game खेळण्यास मनाई केल्याने धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

रवी शिंदे (प्रतिनिधी),

भिवंडी, 29 जून- आईच्या मोबाइलवर पबजी गेम खेळण्यास मनाई केल्याने 15 वर्षीय अल्पवयीन धाकट्या भावाने आपल्या 19 वर्षीय थोरल्या भावाच्या पोटात कैची खोपसून निर्घृण हत्या केली आहे. मोहम्मद हुसैन मोहम्मद अच्छे शाह असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपीला शांतीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौहान कॉलनी, मनपा शाळा क्रमांक 70 जवळीस चाळीत शनिवारी (29 जून) ही घटना घडली आहे. आरोपी मोहम्मद फहाद याने आईचा मोबाइल घेऊन त्यावर तो 'पबजी' गेम खेळत होता. मोहम्मद हुसैन याने त्यास गेम खेळण्यास मनाई केली. एवढेच नाही तर मोहम्मद फहाद त्याच्या जवळील मोबाइल फोन हिसकावून घेतला. याचा राग मनात ठेऊन मोहम्मद फहाद याने हुसैनशी हुज्जत घातली. हुज्जतीचे पर्यवसन हाणामारीत झाले. फहाद याने घरातील कैचीने हुसैन याच्या पोटावर छातीवर सपासप वार करुन त्यास गंभीर जखमी केले. त्याला जखमी अवस्थेत स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनी इतर पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद फहाद विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भाडयाच्या बंगल्यात सुरू होता देहविक्रीचा गोरखधंदा

Loading...

अलिबागच्‍या समुद्रकिनाऱ्यावर बंगला भाड्याने घेऊन देहविक्रीच्या गोरखधंद्याचा रायगड पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने भंडाफोड केला आहे. किनारपट्टी भागात बंगला भाड्याने घेऊन महिलांकडून देहविक्री तसेच अंमली पदार्थ विक्रीचा व्‍यापार केला जात असल्‍याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकून 26 ग्रॅम कोकेन जप्‍त केले आहे.

VIDEO : पुण्यातली भिंत पडली तेव्हा काय घडलं प्रत्यक्ष? CCTV फुटेज आलं समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pubg game
First Published: Jun 29, 2019 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...