मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर शालिमार एक्स्प्रेसमध्ये आढळली स्फोटके

मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. टर्मिनसवर बॉम्बशोधक पथक दाखल झाले असून त्यांनी हे स्फोटके आढळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्फोटके निकामी करण्यात आली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 03:33 PM IST

मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर शालिमार एक्स्प्रेसमध्ये आढळली स्फोटके

मनोज कुलकर्णी (प्रतिनिधी)

मुंबई, 5 जून- मुंबईसह संपूर्ण देशात रमजान ईद उत्साहात साजरी होत असताना लोकमान्य टिळक टर्मिनसवर (कुर्ला) शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. टर्मिनसवर बॉम्बशोधक पथक दाखल झाले असून त्यांनी हे स्फोटके आढळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्फोटके निकामी करण्यात आली आहेत.


मिळालेली माहिती अशी की, हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या सापडल्या आहेत. शालिमार एक्स्प्रेस बुधवारी तब्बल दोन तास उशीरा पोहोचली. प्लॅटफार्मवर सर्वप्रवासी उतरल्यानंतर एक्स्प्रेस यार्डमध्ये आली. सफाई कर्मचारी एक्स्प्रेसची साफ सफाई करताना त्यांना एका बॅगमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या आढळल्या. त्यांनी तातडीने याबाबत सुरक्षारक्षकांना माहिती दिली. घटनास्थळी आरपीएफ, जीआरपी तसेच मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले आहेत. स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. डॉग स्क्वाडला पाचारण करण्यात आले आहे. टर्मिनसचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

चिठ्ठी सापडली...

Loading...

शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्यासोबत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. चिठ्ठीत हिंदी भाषेत मजकूर आहे.  चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे. हे मात्र समजू शकले नाही.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...


VIDEO: मै लिखूँगी क्योंकि... IAS अधिकारी निधी चौधरींनी मांडली व्यथा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 03:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...